
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८८३ वा दिवस ब्राह्मणाची प्रतिष्ठा, क्षत्रियांचे सामर्थ्य आणि वैश्याची संपत्ती ज्या शुद्राच्या श्रमामुळे निर्माण होते ते कोठे आहेत? त्यांचे स्थान काय आहे? जे समाजाचे खरे अंग असूनही ज्यांना सर्व देशात सर्व काळी अत्यंत हीन म्हणून संबोधण्यात येते त्यांची काय अवस्था आहे? भारतीयांनी या प्रश्नांचे उत्तर शोधण्याची गरज आहे. आपण सारे एकाच ब्रम्हाचे अंश आहोत याची जाणीव असू द्या. सर्व लोकांबद्दल सदैव सहानुभूती बाळगा. प्रत्येक जण आपल्याच शरीराचा अवयव आहेत ही भावना जनमानसात निर्माण करा. आपला धर्म जयिष्णू नाही तर सहिष्णू आहे याची जाणीव असू द्या. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर १ वैशाख शके १९४७*★ चैत्र वद्य/कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २१ एप्रिल २०२५ ★ १९३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आंदोलनानंतर सुप्रसिध्द काळाराम मंदिर सर्वांसाठी खुले ठेवण्याचा शासनाचा आदेश
★ १९३८ सारे जहॉसे अच्छा.. सुप्रसिद्ध गीत लिहिणारे कवी सर मुहम्मद इकबाल यांचा स्मृतिदिन.
★ भारतीय नागरी सेवा दिन.
