
न्यायडोंगरी (जगन पाटील) महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार न्यायडोंगरी (जगन पाटील) महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार न्याय व विधी विभागाच्या राष्ट्रीय विधी सेवा समितीच्या वतीने फिरते लोक न्यायालय हा उपक्रम न्यायडोंगरी येथे नुकताच घेण्यात आला या शिबिराचे अध्यक्षस्थानी नांदगाव न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री जे. एम. अग्निहोत्री साहेब हे होते तर नांदगाव न्यायालयातील सर्व विधीज्ञ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

फिरते लोक न्यायालय या संकल्पनेच्या माध्यमातून “न्याय आपल्या दारी” या उपक्रमाचे महत्त्व पटवुन देताना न्यायमूर्ती अग्निहोत्री म्हणाले की लोकन्यायालयात मिटविण्यात येणाऱ्या खटल्यांची प्रामुख्याने चार विभागात विभागणी करण्यात येते त्यात १) लवाद २) मध्यस्थी ३) समन्वय ४) आणि वैकल्पिक समझोता घडवून .न्यायालयात प्रलंबित असलेले विविध प्रकरणे त्यात काही दिवाणी, काही फौजदारी ,काही कौटुंबिक, तर काही वसुली संदर्भातील निकाली काढून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा भार कमी करण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेच्या मनात कोर्ट कचेरी बाबत असलेली भीती दूर व्हावी हा प्रमुख हेतु असून प्रलंबीत दावेदारांनी या उपक्रमात सहभाग घेऊन आपला वेळ,पैसे,होणारा त्रास वाचविण्याबरोबरच शासनास व न्यायव्यवस्थेसही सहकार्य करावे असे प्रतिपादन न्यायमूर्ती “अग्निहोत्री “यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.तसेच न्यायालयात दावा दाखल करण्यापूर्वी ही संमनवयकाचे माध्यमातून वाद कसे मिटविता येतात या विषयी सविस्तर माहिती देऊन या पर्यायाचा वापर करण्यावर भर देण्यात आला.

ॲड वंदना पाटील यांनी महिलांसाठी असलेल्या कायद्यातील तरतुदी समजाऊन सांगितल्या , तर जेष्ठ विधिज्ञ श्री बी आर चौधरी यांनी विवाह विषयक कायदे, कौटुंबिक कलह, व दिवाणी विषयक कायदे बाबत माहिती दिली.ॲड युनुस शेख यांनी फौजदारी कायदे व तरतुदी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.ॲड पी एस पवार यांनी जेष्ठ नागरिकांनसाठी असलेल्या कायद्यातील तरतुदी यावर प्रकाशझोत टाकला ,तसेच अनेक विधीज्ञा नी कायदेविषयक माहिती उपस्थिताना दिली या कार्यक्रमासाठी नांदगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड बी बी बिन्नर उपाध्यक्ष ॲड कुणाल आहेर, विधी सेवा पॅनल सदस्य ॲड रंजन आहेर, वकील संघाचे सचिव शेखर पाटील, तसेच जेष्ठ विधिज्ञ जे आर कासलीवाल, अनिलकुमार शिंदे ,बी आर चौधरी, युनुस शेख,वसंतराव आहेर ,राजेंद्र दराडे , माजी आमदार ॲड अनिलदादा आहेर , जी एस सुराशे, सचिन साळवे,विजय रिंढे, अमोल आहेर,,दिगंबर आहेर, पी एस पवार,उमेश सरोदे ,अक्षय कासलीवाल, राहुल राऊत ,अश्विन महाले ,तुकाराम राठोड , राहुल रायते, व महिला प्रतिनिधी ॲड वंदना पाटील .यांचे सह न्यायडोंगरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुशीला अहिरे, उप सरपंच अमोल आहेर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी व सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अशा स्वयं सेविका, महिला बचत गटांच्या सर्व सदस्या, गाव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड सचिन साळवे यांनी केले तर आभार ॲड अमोल आहेर यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी नांदगाव न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच न्यायडोंगरी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.
