
संभाजीनगर.(प्रतिनिधी ) अन्न वाचवा समिती च्या अन्न वाटप अभियाना अंतर्गत आज अन्न वाचवा समिती तर्फे आधार ह्या वृध्द आश्रमा स जीवनावश्यक किराणा सामान वाटप करण्यात आले.अन्न वाचवा समिती तर्फे शहरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने अंदाजे रूपये 35 हजार पेक्षाही जास्त किंमतीचे जीवनावश्यक किराणा सामान वाटप करण्यात आले. आधार हा निराधार वृद्ध लोकांचा आश्रम असून येथे 27 वृध्द राहत असून आश्रमाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हया आश्रमाच्या व्यवस्थापकाने अन्न वाचवा समिती ला पत्र लिहून, मदत करण्याची विनंती केली. त्या नुसार अन्न वाचवा समिती तर्फे शहरातील काही दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आपण हया किराणा सामान वाटप करण्यात आले. हया वाटप कार्यक्रमास छत्रपती संभाजी नगर चे पोलीस उपायुक्त श्री संपत शिंदे सर, कॅन्सर तज्ञ डॉ सुनिल देशमुख, उच्च न्यायालयातील वकील एड.श्रीचंद जिगयासी, प्रभाकर दिवटे, दिलीप आसबे शिवाजी पाथ्रीकर, राजेंद्र वाहुळे, हेडगेवार नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्या डॉ सुप्रिया चिंचपुरे, सौ. दिपाली जहागिरदार , श्री देवीदास खोडके, अन्न वाचवा समिती चे प्रवर्तक अनंत मोताळे हे उपस्थित होते
