
नांदगाव, दि.20 (मुक्ताराम बागुल):- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या कसारी घाटात दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी रविवारी बोलठाण कडून नांदगाव कडे जाणारी वर्हाडाची स्कूल बस पलटी झाली. यात दहा ते बारा जण जखमी झाले असून मोटर सायकल स्वार यास जास्त मार लागल्याची माहिती समोर आली आहे. दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी रविवारी लासुर स्टेशन येथून लग्नाची वऱ्हाडाची स्कूल बस बोलठाण कडून नांदगाव कडे जात असताना कसारी घाटात पलटी झाली. यामध्ये दहा ते बारा जण गंभीर जखमी

झाले असून त्यांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. तर मोटर सायकल स्वार यास चांगलाच मार लागल्याचे समजते. सदर जखमींचे नावे अद्याप पर्यंत कळालेले नाहीत. या घटनेची नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
