
नांदगाव ( प्रतिनिधी). सोबती सामाजिक संस्थेच्या व अल ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्ताने नांदगाव तालुक्यातील कार्यात माळेगाव येथे शेतकरी व आदिवासींच्या मुलांसाठी मोफत स्कूल बॅग व वह्या वाटप करण्यात आल्या. सोबती सामाजिक संस्थेच्या वतीने व ऑल ग्रुप ऑफ कंपनी यांच्यावतीने नांदगाव तालुक्यातील माळेगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134 जयंती साजरी करण्यात आली.

या जयंती निमित्ताने आदिवासी व शेतकरी यांच्या मुलांना मोफत स्कूल बॅग वह्या वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नांदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चिंचोले सर व केंद्रप्रमुख सोनवणे सर हे होते. सदर कार्यक्रमाची सूत्रसंचालन जायभावे सर यांनी केले. सदर कार्यक्रमाची सुरुवात बुध्द वंदना घेऊन करण्यात आली. कार्यक्रमात दिप प्रज्वलन नांदगाव गटशिक्षणाधिकारी चिंचोले सर व जगन अहिरे, सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमात मुलांच्या भाषेत स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच गायन स्पर्धा देखील घेण्यात आल्या.

या कार्यक्रमाला राजू लहिरे, हरिभाऊ अहिरे, देशमुख सर, खेडकर सर, बावस्कर मॅडम, यांची प्रमुख उपस्थित होती. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पद सोबती सामाजिक संस्थेचे सचिन जगन अहिरे यांच्याकडे होते. यावेळी शिक्षणाधिकारी चिंचोले सर यांनी प्रमुख भाषण केले. यावेळेस चिंचोले सर यांनी शैक्षणिक दान या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.तर सोनवणे सरांनी मुलांना शिक्षण हे वाघिणीचे दूध असते याचा अर्थ समजावून सांगत व मार्गशीर केले.तसेच राऊत सर यांनी मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य थोडक्यात सांगितले.राजु लहिरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गीत सादर केले. तसेच 250 मुलांना मोफत वह्या व स्कूल बॅग स्कूल सोबती सामाजिक संस्थेची सचिव जगन अहिरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सुपर कार्यक्रमाचे नियोजन संतोष अहिरे, दुर्गादास अहिरे, बाळू लोंढे, सागर लोंढे, सुभाष साळवे, गौतम अहिरे, गणेश लोंढे यांनी केले. पाचशे लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कार्यात माळेगाव यांच्याद्वारे करण्यात आले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संतोष आहिरे यांनी केले. तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांचे व आलेल्या सर्व ग्रामस्थांचे व मुलांची सोबती सामाजिक संस्था सचिव जगन अहिरे यांनी आभार मानले.
