
नांदगाव, दि. 20 (मुक्ताराम बागुल):- नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे चक्क आपल्या सहकारी मित्र व कार्यकर्त्यांसोबत साध्या हॉटेलमध्ये ताव मारला त्यामुळे पाहणाऱ्यांच्या मनात एकच भावना आली ती म्हणजे सर्वसामान्यांचा आमदार… सुहास अण्णा. सध्या लग्नसराईचा सीजन सुरू आहे. पाणी शक्य होईल त्या प्रत्येक ठिकाणी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शक्य होईल त्या प्रत्येक ठिकाणी भेट देण्याचे काम करत आहेत. अशातच दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी शनिवारी नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील पूर्व भागात असलेल्या बोलठाण येथील नाक्यावर असलेल्या राजे पाव वडा सेंटर वर आपल्या सहकारी मित्र व कार्यकर्त्यांसोबत पाव वाड्यावर ताव मारला. पाव वड्यावर गाव मारणारा आमदार पाहून पाहणाऱ्यांच्या मनात एकच भावना आली ती म्हणजे…. सर्वसामान्यांचा आमदार सुहास अण्णा कांदे अशी भावना निर्माण झाली.
