
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बी.एस्सीचे पेपर सुरू आहेत. याच काळात लग्न सराईपपण जोरदार सुरू आहे. अशातच लग्नं आणि परीक्षा या गुंतागुंतीत अडकलेली नववधू ची परीक्षा की लग्न अश्या दोलायमान स्थितीत नववधू पुढे प्रश्न पडला .पण शिक्षण हे महत्त्वाचे मानुन नववधूने आपल्या साजशुंंगारासह प्रथम महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी प्राधान्य दिले. तिच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. जळगाव बुद्रुक ( ता.नांदगाव) येथील प्रगतिशील शेतकरी भागवत किसन कांदे यांची सुकन्या प्रतिभा हिचा शनिवारी दि. 19 एप्रिल २०२५ रोजी येथील मातोश्री लॉन्स वर दुपारी १२.३५ वा. मिनिटांनी रोंझे तालुका मालेगाव येथील वाल्मीक बाबुराव उगले यांचे चिरंजीव योगेश यांच्या बरोबर विवाह झाला. लग्न ठरविण्यापूर्वी तारीख निश्चित केली होती. तोपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षेच्या तारखा निश्चित झालेल्या नव्हत्या नववधू प्रतिभा ही बीएससी च्या अंतिम वर्षाला येथील मराठा विद्या प्रसारक संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेत आहे नेमका लग्नाच्या दिवशी तिचा बीएससीचा रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता सकाळी दहा ते बारा या वेळेत तिचा पेपर होता लग्न आणि परीक्षेचा पेपर यापैकी काय निवडावे या संभ्रमात असताना वधू- वर प्रतिभा व योगेशच्या पालकांनी लग्न लावूच पण परीक्षेचा मुहूर्त ही टळू देणार नाही अशी भूमिका घेऊन प्रतिभा या नववधूला साज शृंगरात आपल्या आत्या मावशीला सोबत घेऊन मांडवातून थेट परीक्षा केंद्रात आली भावी पतीकडून मिळालेले प्रोत्साहन प्रतिभाला बळ देऊन गेले. तिने ठरलेल्या वेळेत पेपर दिला त्यानंतर ती विवाह स्थळाकडे रवाना झाली. वर योगेश याच्यासोबत प्रतिभा विवाहबद्ध झाली आणि दुपारी दोन वाजता प्रतिभा आणि योगेश यांचा विवाह संपन्न झाला . प्रतिभाच्या जिद्दीचे नांदगावसह परीसरात कौतुक होत आहे.
