
मनमाड ( प्रतिनिधी )मनमाड शहरात दहशत माजावणारा बिबट्या अखेर सापळ्यात अडकला,झाला जेरबंद*अखेर रात्री बिबट्या जेरबंद झाला…पिंजऱ्यात अडकला त्याला नाशिक येथे नेण्यात येत आहे नंतर तपासणी होईल…नागरिकांनी सोडला निःश्वास…आता काळजीचे कारण नाही…बिबट्या शुक्रवारी रात्रीपासून मनमाडच्या आय यू डी पी भागातील पांझण नदीकिनारी भगवान वाल्मिकी स्टेडियम शेजारी असलेल्या गुरुद्वाराच्या उसाच्या शेतात लपून बसला होता. वन विभागाने शनिवारी दुपारी तेथे पिंजरा बसविला .नंतर तो बाहेर आला. व पिंजऱ्यात अडकला… परवापासून हा बिबट्या बुद्धलवाडी ,दरगुडे वस्तीत धुमाकुळ घालत दोन कुत्र्यांवर त्याने हल्ला केला होता. वन अधिकाऱ्यांनी पिंजऱ्यात शेळी चे आमिष ठेवून आज शनिवारी दुपारी वीट भट्टीजवळ पिंजरा लावला त्यात तो अडकलासर्व संबंधित वन विभाग अधिकारी पोलिस यांचे अभिनंदन…शनिवार दि १९ एप्रिल २०२४ रात्री ९ वाजता
