
नांदगाव (प्रतिनिधी )शनिवार दिनांक १९/०४/२०२५ रोजी ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित श्री सिद्धिविनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नांदगाव, तालुका- नांदगाव, जिल्हा- नाशिक, या ठिकाणी बीएड द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संस्थेचे सरचिटणीस माननीय आप्पासाहेब पगार, प्रमुख पाहुणे पेडकाई माता माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक माननीय योगेश पाटील सर यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य प्रा. विक्रम घुगे सर हे होते, कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गीताने झाली, एप्रिल 2024 च्या वार्षिक परीक्षेमध्ये कुमारी कनक योगेश पाटील या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केल्याबद्दल तिच्यासह द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुणे यांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले, तसेच शैक्षणिक वर्ष 2024 -25 मध्ये महाविद्यालयात आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला त्यांचाही गुणगौरव करण्यात आला, यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आप्पासाहेब पगार, श्री योगेश पाटील सर महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रा. रवींद्र सुरसे सर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी ताडगे भाग्यश्री व बोराडे तेजश्री यांनी केले,त्याचबरोबर या महाविद्यालयातून आम्ही कसे घडलो हे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आप्पासाहेब पगार यांनी

ग्रामीण भागातील विद्यार्थी हा व्यवसायिक शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच तो सर्व स्पर्धेमध्ये सर्वोच्च यश संपादन कसे करतो याविषयी मार्गदर्शन केले, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदलानुसार आजचा शिक्षक सर्व गुणसंपन्न असला पाहिजे याविषयी श्री योगेश पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका कांबळे मॅडम व गवळी मॅडम, प्रा. इप्पर सर, पवार सर,किरण बोरसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लाखी किरांत या विद्यार्थ्यांनी केले व राष्ट्रगीताने आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला,
