
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८८२ वा दिवस भूतकाळाकडे पाहात राहिल्याने अधोगती होते व काहीच साध्य होत नाही आणि म्हणून आपण नेहमी भविष्यकाळाकडे नजर ठेवली पाहिजे. हे खरे आहे. पण भूतकाळाच्या पायावरच भविष्याची उभारणी होत असते. म्हणून शक्य तेवढा भूतकाळाचा मागोवा घ्या. भूतकाळातच आपल्या पूर्वजांचा जाज्वल्य व दैदिप्त्यमान इतिहास दडलेला आहे. तो जाणून घ्या. आपण सारे किती महान वंशजांची संतान आहोत याचा अभिमान बाळगा. भूतकाळातील ज्ञानाच्या शाश्वत झऱ्यांचे जल आकंठ प्राशन करा. आणि मग समोर पहा, प्रगतीपथावर पुढे पुढे चला व भारताला पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी अधिक थोर व अधिक उन्नत बनवा.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ३० चैत्र शके १९४७
★ चैत्र वद्य/कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २० एप्रिल २०२५
★ ईस्टर संडे
★ १७४९ पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पुणे येथील पर्वतीवर स्थापना केली.
★ १७७० प्रसिद्ध दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
★ १८८९ जर्मनीचा हुकूमशाहा व महत्वाकांक्षी सेनानी अॅडाल्फ हिटलरचा जन्मदिन.
★ १९९२ खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अँटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोदड येथे उभारली गेली.
