
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८८१ वा दिवस ऋषित्व म्हणजे काय? शुद्ध, पवित्र, चारित्र्यसंपन्न, सात्विक, सत्यवान पुरुष. मी ऋषी आहे असे केवळ म्हटल्याने कार्यभार साध्य होणार नाही. मात्र जेव्हा ऋषीच्या अंगी असलेले सर्व गुण तुमच्यात येतील, तेव्हा सर्वजण स्वभावतःच तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागतील. तुमच्यातून असे अद्भुत सामर्थ्य निर्माण होईल की, त्याच्या प्रभावानेच ते तुमचे अनुसरण करतील, तुमचा शब्द मानतील. स्वतःच्या इच्छेविरुद्धही ते नकळत तुमच्या योजना सफल करण्यास तुम्हास सर्वतोपरी सहाय्य करतील. यालाच ऋषित्व असे म्हणतात.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २९ चैत्र शके १९४७
★ चैत्र वद्य/कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १९ एप्रिल २०२५
★ सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ
★ १८८२ उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडणारे महान जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा स्मृतीदिन★ १८९२ भारतातील सुप्रसिध्द बालशिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्मदिन
★ १९१० नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध करणारे युवा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना फाशी, स्मृतिदिन.


