
पुणे (प्रतिनिधी )१४ वी राज्यस्तरीय चित्र रंगभरण स्पर्धेत बारा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला-*साई कला आविष्कार नाट्य संस्था , भोसरी व श्रीमती चंद्रकला किशोरील गोयल , प्रतिष्ठान,पुणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका थोर व्यक्तीच्या कार्याचा परिचय विद्यार्थी वर्गात व्हावा. म्हणून ही स्पर्धा राबविण्यात येते .या चौदाव्या वर्षी राजमाता जिजाऊ हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून बारा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .सहभागाबद्दल प्रत्येक सहभागी ला संस्थेच्या वतीने फोर कलर सन्मानपत्र देण्यात आले आहे.तसेच विजेत्यांना बक्षीस गोल्डन मेडल, सन्मानपत्र देण्याचा कार्यक्रम यावेळी सायन्स पार्क चिंचवड पुणे १९ येथे २०एप्रिल २०२५ला सकाळी- ११ वाजता संपणार आहे. यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक व कलाशिक्षक यांना सुद्धा सन्मानित स्मृतिचिन्ह देऊन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे कवी साहित्यिक समाजसेवक डॉ. शांताराम कारंडे, मुंबई तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा तानाजी मालुसरे यांच्या तेराव्या वंशज प्रा. शितल मालुसरे रायगड तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चिंचवड विधानसभा चे युवा आमदार शंकरभाऊ जगताप यावेळी उपस्थित राहणार आहे. समाजभूषण पुरस्कार, नक्षत्र गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय बालकलाकार पुरस्कार, राज्यस्तरीय उत्कृष्ट सहभाग दौलत पुरस्कार तसेच आदर्श राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य आहे.यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना सायन्स पार्क येथील तारांगण, आकाशगंगा,थ्रीडी शो आणि विज्ञान केंद्राची भेट घडून आणण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी सुनियोजित केल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळ- सायन्स पार्क नाट्यगृह पुणे मुंबई हायवे शेजारी, चिंचवड ,पुणे १९ या ठिकाणी सकाळी ११ वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
