
सिन्नर (प्रतिनिधी)मराठा विद्या प्रसारक समाज संस्था शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय काम करीत असून सिन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक आदरणीय कृष्णाजी भगत साहेब यांनी केले ते सोनांबे जनता विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ वसंतराव पवार रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

अध्यक्ष स्थानी शालेय समिती अध्यक्ष नंदू पाटील पवार होते सरपंच जनार्दन पवार,शालेय समिती सदस्य तथा माजी जी प सदस्य केरू पवार ,निवृत्ती बोडके,कचरू शिंदे,गजेंद्र सातपुते,भाऊसाहेब विठ्ठल पवार,चंद्रभान पवार,संतोष पवार,रमेश पवार,देव नदी खोरे पतसंस्थेचे चेअरमन गुरुवर्य बी एम पवार सर,पालक संघाचे उपाध्यक्ष नितीन पवार,शिबिर समन्वयक रवी सोनवणे,शिबिरातील तज्ज्ञ डॉ नारायण भताने,डॉ शिवानी हळसे,महेंद्र घोटेकर,किरण पवार,मरियम गावित,प्रतिभा गावित आदी उपस्थित होते.विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा या उदात्त भावनेने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ वसंतराव पवार महाविद्यालयाच्या वतीने हजारो गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा निरंतर दिली जाते.ही सेवा अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून हा उपक्रम संस्थेचे सरचिटणीस ॳॅड नितीन ठाकरे साहेब व कार्यकारिणीने राबविला असल्याचे ते म्हणाले

.कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी मनोगत व्यक्त केले.मराठा विद्या प्रसारक समाज संस्था सातत्याने शैक्षणिक क्षेत्रा बरोबर सामाजिक,वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असून समाजाला सातत्याने त्याचा फायदा होत असल्याचे ते म्हणाले.छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन,दीपप्रज्वलन व डॉ राजेंद्र गोऱ्हे यांच्या हस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी केले.आभार पर्यवेक्षक दिगंबर जाधव यांनी मानले.या शिबिरात सुमारे १४० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.त्यातील १६ रुग्णांवर नाशिक येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होणार आहे.यावेळी सोनारी, सोनांबे, हरसुले,वडगाव, औंढेवाडी, लोनारवाडी, खापराळे आदी ठिकाणावरून आलेले रुग्ण,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
