
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव शहरात दरवर्षी मस्तानी अम्मा यांचा उरुस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या वर्षी २०२५ हा उरुस साजरा करण्यासाठी. आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मस्तानी अम्मा उरुस कमिटीची 2025 नांदगाव बैठक घेण्यात आली.या बैठकीत मस्तानी अम्मा उरुस च्या अध्यक्षपदी श्री अय्याज भाई शेख यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अयाज भाई शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
