
डॉ.महेंद्र शिरसाठ
ईगतपुरी (तालुका प्रतिनिधी)- नवनाथ गायकर यांजकडुन——–
ईगतपुरी तालुक्यातील महाराष्ट्रभर परिचित मुरमुरा, भात बाजारपेठ असलेल्या घोटी बु ! शहरात समर्थ सहयाद्री मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा नुतन वास्तुमध्ये रविवारी दि.२० एप्रिल रोजी भव्य असा स्थलांतर सोहळा होतो आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे हस्ते व राज्याचें दिग्गज मंत्र्याचे उपस्थितीत आयोजीत केल्याची माहिती समर्थ सहयाद्री मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल चे संचालक डॉ.महेंद्र शिरसाट यांनी दिली आहे.यावेळी राज्यातील तब्बल अर्धा डझन मंत्री व अनेक आमदार, खासदार हजर राहणार आहेत. नाशिक-घोटी-ईगतपुरी-मुंबई तसेच सिन्नर- शिर्डी व समरुद्धी महामार्गालगत हे सुसज्ज हॉस्पीटल नव्याने उभारण्यात आले आहे. हा स्थलातंर सोहळा उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचेसह राज्याचे औषध प्रशासन मंत्री ना.नरहरी झिरवाळ , माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री ना.माणिकराव कोकाटे, आरोग्यमंत्री ना.प्रकाश आविटकर, राज्यमंत्री ना.मेघना बोर्डिकर, खा.राजाभाऊ वाजे,आ.हिरामण खोसकर , दिलीप बनकर, राहुल ढिकले, किरण लहमटे, सिमा हिरे, सरोज आहिरे, देवयानी फरांदे, माजी खा.हेंमत गोडसे आदिसह असंख्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल चे माध्यमातुन ईगतपुरी या आदिवासी तालुक्यासह नाशिक, अकोले, सिन्नर, त्रंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, पालघर, कसारा, शहापुर आदीसह लगतच्या विविध तालुक्यातील रुग्णाचींही येथे मोठी सोय होणार असल्याचे डॉ. शिरसाट यांनी सांगितले आहे.मुंबई, पुणे, नाशिक व ठाणे शहरासारख्या सुसज्ज हॉस्पीटल प्रमाणेच हे आधुनिक व अदययावत सोयीनीं नटलेले हॉस्पीटल आहे. या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल मधे डॉ.अमन नायकुडी,डॉ.अंजुम नायकुडी , डॉ.महेंद्र शिरसाट, डॉ. सुनिल बुळे, डॉ.दत्ता सदगीर, डॉ.सविता बुळे, डॉ. घनशाम बर्हे, डॉ. शैलेश देशपांडे , डॉ. योगेश भागडे , डॉ.सत्यवान रोकडे, डॉ.प्रियंका चौधरी आदी या हॉस्पीटल चे संचालक व कुशल सर्जन, डॉक्टर ची परिपुर्ण टिम आहे.विशेष म्हंणजे ही सर्व डॉक्टर मंडळी ईगतपुरी तालुक्यातीलच भुमिपुत्र आहेत हा मोठाच अभिमानाचा क्षण आहे. यावेळी श्री मेडिकल चे ही शुभारंभ मान्यवराचें हस्ते होणार आहे.———————-रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर – डॉ. शिरसाट घोटी शहरात समर्थ सहयाद्री मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल गेले अनेक वर्षापासुन रुग्णानां सेवा देत आहे. आता सुसज्ज इमारत, अदयावत वैदयकिय उपकरणे, आधुनिक तंत्रज्ञान या माध्यमातुन हे हॉस्पीटल पुढील काळातही सेवेचा वारसा कायम ठेवेल.


