
नांदगाव (प्रतिनिधी) नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे विद्यमान अध्यक्ष व क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था नाशिक संस्थेचे संचालक त्र्यंबक महादू डोंगरे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही (T.D.F) यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे तसेच शिक्षण मंत्री ना.दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्र्यंबक महादू डोंगरे (सर) यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे यामुळेच त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक हा पुरस्कार दिला जात आहे. यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वडाळी बुद्रुक येथे मुख्याध्यापक म्हणून यशस्वी कारकीर्द निभावली. त्याचबरोबर नाशिक जिल्हा टी . डी.एफ. चे कार्यवाह,नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ चे उपाध्यक्ष,एनडीएसटी सोसायटीचे तज्ञ संचालक, नांदगाव विज्ञान अध्यापक संघाचे कार्यवाह या पदावर त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थी यांना नेहमी मदत करतात. या सर्व शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना 26 एप्रिल रोजी पालघर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या निमित्ताने तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील नागरिकांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
