
ओझर: दि.१८ वार्ताहर
ओझर येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयाचे कलाध्यापक अरुण सावंत नियत वयोमानानुसार ३८.वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. भास्कर गार्डन कोकणगाव ता निफाड येथे झालेल्या या सेवापुर्ती सोहळ्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर प्रमुख मान्यवर अध्यक्ष डॉ राहुल ढिकले सभापती बाळासाहेब क्षिरसागर विश्वासराव मोरे डी बी मोगल संचालक शिवाजी गडाख प्रवीण जाधव ॲड लक्ष्मण लांडगे डॉ सयाजीराव गायकवाड अमित बोरसे महिला संचालिका शोभाताई बोरस्ते शिक्षणाधिकारी डॉ भास्करराव ढोके डॉ एस के शिंदे सी डी शिंदे जगन्नाथ निंबाळकर साहित्यिक लक्ष्मण महाडिक रवींद्र मालुंजकर संदीप देशपांडे प्रकाश होळकर शाळा समितीचे अध्यक्ष भास्करराव शिंदे व्यवस्थापनचे अध्यक्ष प्रकाश महाले सर्व सदस्य मुख्याध्यापक सोपान वाटपाडे अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील पर्यवेक्षक दशरथ शिंदे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. संगीत शिक्षिका शितल आहेर व गीतमंचाने स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी सेवापूर्ती कलाशिक्षक अरुण सावंत यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. व्यासपीठावरील प्रमुख अतिथींचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी मान्यवर अतिथी डॉ सविता गायखे, डॉ एस के शिंदे, उपसभापती डी बी मोगल, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांच्या हस्ते सेवापूर्ती कलाध्यापक अरुण सावंत यांचा यथोचित सत्कार, तर पत्नी मंगल सावंत यांचा सत्कार महिला संचालिका शोभाताई बोरस्ते यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अरुण सावंत यांनी मनोगतात कला साहित्याविषयी थोडक्यात प्रसंग व्यक्त करीत उपस्थितांचे आभार मानले. अध्यक्षीय मनोगतात ॲड नितीन ठाकरे यांनी अरुण सावंत यांच्या कला साहित्याचे कौतुक करीत भावी जीवनात संस्थेचे हित जोपासण्यासाठी कार्यरत राहून संस्थेच्या सेवकांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करून त्यांच्या भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. फलक रेखाटन कलाशिक्षक मोहन क्षीरसागर मोनाली निकम यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील आजी-माजी प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आप्तेष्ट नातेवाईक सगेसोयरी मित्रमंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले शितल हांडोरे यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील यांनी मानले.
