
सिन्नर (प्रतिनिधी )छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा जोतिबा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त वसाहतीजवळील गणेश नगर मधील महापुरुषांच्या जीवनावर आधारित भाषण,गाणी,पोवाडे, नृत्य स्पर्धा पार पडली संयुक्त जयंती उत्सवानिमित्त माननीय श्री श्रीकांत जाधव माजी नगरसेवक यांनी केली बुद्धवंदना सामुदायिक पद्धतीने मुद्रांक विक्रेते जगन्नाथ इनामदार व मधुकर जाधव समन्वयक बुद्धीस्ट सोसायटी सिन्नर यांच्या वतीने घेण्यात आले पुष्पहार व श्रीफळ नाशिक लोकसभा खासदार राजाभाऊ वाजे व सह्याद्री युवा मंच चे अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांच्या हस्ते वाढवण्यात आले व उपस्थित असलेल्या आंबेडकरी जनतेला संयुक्त जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच निवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांनी अतिशय सोप्या भाषेत महापुरुषांच्या जीवनकार्याची माहिती बाळगोपालांसमोर मांडली जयंती उत्सवा निमित्त स्पर्धेतील विजेत्यांना पावण्यांच्या हस्ते चषक,शालेय साहित्य व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले

या वेळी खासदार राजाभाऊ वाजे,उदयभाऊ सांगळे निवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे,माजी नगरसेवक श्रीकांत जाधव ,भाऊसाहेब शिरसाठ सरपंच गुळवंच, मुद्रांक विक्रेते जगन्नाथ इनामदार महामित्र निवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे व माजी नगरसेवक प्रभाकर जाधव ,मंगेश जाधव ता. अध्यक्ष आर. पी.आय ,मधुकर जाधव ,बाबासाहेब लहासे, सागर लहासे,आनंद आढाव,रवींद्र पठाडे,दीपक आनप,मंगेश परदेशी,गणेश परदेशी,योगेश बोराळे,दशरथ डापसे,राकेश यादव,सूर्यबली यादव,भीमा गलांडे,दत्तू कांदळकर,उमेश हारक,नितीन कराळे,वृषभ जाधव,साहिल जाधव,सिद्धार्थ कर्डक, महीला पुरुष यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धक – साधीमा फारुख तांबोळी, अंजली महंती, श्रेयस बागुल, अयान तांबोळी, भाग्यश्री लेमाडे, आराध्या गणेश जाधव, ज्ञानेश्वरी अरुण सांगळे, समृद्धी पगारे, आराध्या जगताप, अश्विन सांगळे, समृद्धी जारे, धनश्री मोरे, वरील मुलांचे महापुरुषांवरील भाषणे,पोवाडे,गाणे व नृत्य सादरीकरण करण्यात आले वरील मान्यवरांच्या हस्ते त्यांना चषक व शालेय साहित्य पारितोषिक देण्यात आले
