
शुक्रवार दिनांक १८-०४-२०२५चा गुड फ्रायडे!! ” आज गुड फ्रायडेच्या प्रत्येक क्षण न क्षणांचं महत्त्व “प्रत्येक धर्मात आठवड्यातील एका दिवसाचं महत्त्व ठरलेलं असतं , ज्यू -यहुदींचा शनिवार , ख्रिस्ती धर्माचा रविवार तसेच ईस्लाम मध्ये ” जमूआ शब्दाचा अपभ्रंश होऊन” जुममा ” झालं. अर्थात शुक्रवार. जगाच्या इतिहासात शुक्रवारच्या अनेक प्रसिद्ध घटना घडलेल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने “इसा मसिहा ” अर्थात प्रेषित इसा मसिहा यांना २०२४ वर्षांपूर्वी शुक्रवारच्या दिवशीच यहुदी ज्यू शासकांनी यरुशलेममधै राजद्रोहाचा चुकीचं आरोप लावून चुकीच्या गुन्ह्याखाली सुळीवर लटकावून मारलं होतं तो दिवस ख्रिश्चन धर्मात ” गुड फ्रायडे ” म्हणून पाळला जातो.पवित्र कुरआन मधे इसा मसिहांना” प्रेषित ‘म्हणून उल्लेख आढळतो , तसेच इसा मसिहांच्यां मातोश्री हजरत मरीयम यांचा उल्लेख पवित्र कुराण मधे सोळाव्या पारा व एकोणिसावा सुरह – ए – मरीयम आहे व त्याचे ९८ आयाति आहेत . हजरत ईसा अलै .” गुड फ्राईडे ” नाव ऐकून थोडं बुचकळ्यात पडतात की हा मोठा आनंद उत्साह असेल खरं तर शोक दिवस म्हणूनच जगात पाळला जातो. ईसा मसिहा येरूशेलम मधे मानवी कल्याणासाठी एकता, भाईचारा व सर्वत्र शांतता नांदावी यासाठी उपदेश देत असतं, अशा मानवी कल्याणाचा ध्यास घेतल्यानंतर तेथील स्थानिक व आजुबाजुचे लोक त्यांना परमेश्वराचे दूत मानू लागले. त्याकाळच्या पाखंडी धर्मगुरूंना हे सहन झाले नाही. म्हणून ईसा मसिहांच्या विरूद्ध तेथील राजाचे कान भरले. एक दिवस त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून, त्यांना दोषी ठरवून त्यांचा अतोनात छळ केला गेला . डोक्यात काटेरी ताज घालून ईसा मसिहांच्यां खांद्यावर क्रूस ठेवून फरफटत ओढत चाबकाचे घाव देत हाल हाल करून दोन्ही हात ,पाय ,व शरीराच्या काही भागात खिळे ठोकण्यात आले. इसा मसिहानां सुळीवर जवळ जवळ सहा तासांपेक्षा जास्त वेळ तशाच अवस्थेत ठेवले. परंतु त्या वेळी तुफान वेगाने वादळं आलीत, तीन तास अंधार पडला होता. तो दिवस “गुड फ्रायडे ” चा दिवस होता व वेळ तीन वाजेची होती …परंतु एवढ्या यातनामय अवस्थेत सुध्दा इसा मसिहांच्या तोंडून त्या पाशवी वृत्तीच्या कृतीला ही त्यांनी ईश्वराजवळ त्यांच्यासाठी शब्द होते, “” हे ईश्वर त्यांना क्षमा कर ! कारण त्यांना हे समजत नाही की, ते हे काय करत आहेत !!.”प्रेषित इसा मसिहांनी मानव कल्याणासाठी हसत हसत आपली कुर्बानी ( बलिदान) दिली. याच ‘गुड फ्रायडे’ ला कुर्बानी (बलिदान) दिवस स्वरूपात मानतात व तीन वाजता जगातील सर्व चर्चमध्ये प्रार्थना सभा घेतात. आज पवित्र शुक्रवार तर आहे, परंतु ” इसा मसिहां” यांचा मानवी कल्याणासाठी दिलेल्या बलिदानाचा ही पवित्र दिवस आम्हाला मिळालेला आहे.. तर आजचा दिवसातील क्षण न क्षणाचं किती पावित्र्य असेल; दया- करुणा प्रार्थना -दुआ-सर्वांनी करावी..
*गुड फ्रायडे!*
