
सिन्नर (प्रतिनिधी ) येसु ख्रिस्त बलिदान दिन तथा गुड फ्रायडे निमित्त महामित्र परिवाराचे वतीने सिन्नर येथिल छत्रपती शिवाजीमहाराज चौकात अभिवादन करण्यात आले*.*छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास राजेंद्र सातपुते यांनी तर येशु ख्रिस्ताच्या प्रतिमेस गणपत काळे यांनी पुष्पमालेले मानवंदना दिली*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाल की प्रत्येक धर्मात आठवड्यातील एका दिवसाचं महत्त्व ठरलेलं असतं , ज्यू -यहुदींचा शनिवार , ख्रिस्ती धर्माचा रविवार तसेच ईस्लाम मध्ये ” जमूआ शब्दाचा अपभ्रंश होऊन” जुममा ” झालं. अर्थात शुक्रवार. जगाच्या इतिहासात शुक्रवारच्या अनेक प्रसिद्ध घटना घडलेल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने शुक्रवारच्या दिवशीच यहुदी ज्यू शासकांनी यरुशलेममधै राजद्रोहाचा चुकीचं आरोप लावून चुकीच्या गुन्ह्याखाली सुळीवर लटकावून मारलं होतं तो दिवस ख्रिश्चन धर्मात ” गुड फ्रायडे ” म्हणून पाळला जातो.पवित्र कुरआन मधे इसा मसिहांना” प्रेषित ‘म्हणून उल्लेख आढळतो , तसेच इसा मसिहांच्यां मातोश्री हजरत मरीयम यांचा उल्लेख पवित्र कुराण मधे सोळाव्या पारा व एकोणिसावा सुरह – ए – मरीयम आहे गुड फ्राईडे खरं तर शोक दिवस म्हणूनच जगात पाळला जातो. ईसा मसिहा येरूशेलम मधे मानवी कल्याणासाठी एकता, भाईचारा व सर्वत्र शांतता नांदावी यासाठी उपदेश देत असतं, अशा मानवी कल्याणाचा ध्यास घेतल्यानंतर तेथील स्थानिक व आजुबाजुचे लोक त्यांना परमेश्वराचे दूत मानू लागले. त्याकाळच्या पाखंडी धर्मगुरूंना हे सहन झाले नाही. म्हणून ईसा मसिहांच्या विरूद्ध तेथील राजाचे कान भरले. एक दिवस त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना दोषी ठरवून त्यांचा अतोनात छळ केला गेला.डोक्यात काटेरी ताज घालून ईसा मसिहांच्या खांद्यावर क्रूस ठेवून फरफटत ओढत चाबकाचे घाव देत हाल हाल करून करून दोन्ही हात पाय व शरीराच्या काही भागात खिळे ठोकण्यात आले अशा प्रकारे त्याचा छळ करण्यात आलेआज पवित्र शुक्रवार तर आहे, परंतु ” इसा मसिहां” यांचा मानवी कल्याणासाठी बलिदान दिले अशा महान येशु ख्रिस्त यांना विनम्र अभिवादनया कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी तर प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.व आभार मनोज माळी यांनी मानले या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,राजेंद्र सातपुते,गणपत काळे,रोहित सानप, अखिलेश सानप, सुनिल सानप, संतोष सानप,विजय मुठे,नरहरी गोळे,कतिॅक गोळेसर,नामदेव कुटे,प्रकाश माळी,मनोज माळी,दत्ता झगडे, बापु चव्हाण सैय्यद रफीकरजा आदी.उपस्थित होते
