
पिंपळनेर [ प्रतिनिधी ] विश्वशांती बुध्दिस्ट फाऊंडेशन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी धुळे शहर यांचा बहुमानांकित , बहुचर्चित , सदैव चर्चेत असलेला, बहुसंख्य प्रस्तावातून निवडक साहित्यिकांना दिला जाणारा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भुषण पुरस्कार २०२५ नुकताच राज्य सरकारी कल्यान भवन शिवतिर्थ धुळे येथील सभाग्रहात उत्साही वातावरणात खान्देशातील गावगाडाकार कवी लेखक संपादक श्री साहेबराव नंदन [ तात्या ] ताहाराबादकर नाशिक यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. भास्करराव अमृतसागर, साहित्यिका कवयित्री मुंबईच्या आशाताई ब्राम्हणे यांच्या शुभ हस्ते टाळ्यांच्या कडकडाटात प्रदान करून, सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी राज्यभरातील बहुसंख्य साहित्यिक आणि जेष्ठ विचारवंत उपस्थित होते. साहेबराव तात्यांना मिळालेल्या पुरस्काराचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्रातून व सामाजिक संस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव करत आनंद व्यक्त केला आहे.
