
सिन्नर(प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान आणि त्यांचे विचार हे आपल्या कृतीत आणण्याची गरज आहे तसेच छत्रपती शाहू, फुले ,आंबेडकर यांचा पुरोगामी वारसा जतन ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच असून त्यानुसार आचरण ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. मुंगसे यांनी आपल्या व्याख्यानातून केले. तसेच महापुरुषांचा वारसा पुढे चालवत असताना परस्त्रीविषयक मातेसमान असणारा दृष्टिकोन आपल्यासमोर असावा व स्वतः निर्व्यसनी राहून संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी तुमची आमची सर्वांचीच असून प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी युवकांनी पुढाकार घेऊन देश कार्यासाठी हातभार लावावा असे आवाहन प्राध्यापक मुंगसे यांनी केले.

पिंपळे येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३४व्या जयंतीनिमित्त प्रा.मुंगसे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष व पिंपळे येथील सरपंच संपतराव बिन्नर तसेच हिवरे येथे सरपंच डॉक्टर दशरथ रूपवते ,पोलीस पाटील दीपक चव्हाण ,विनायक बिन्नर, प्रा. आर .बी. गायकवाड, पिंपळे गावचे माजी सरपंच भाऊसाहेब घुगे, एडवोकेट राहूल रोकडे, भाऊसाहेब पानसरे, सुदाम रुपवते,बबन निकाळे, दीपक रूपवते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुरुवातीला पिंपळे गावातील सर्व जाती धर्मातील ग्रामस्थांनी सहभाग घेऊन एक आदर्शवत शोभायात्रा काढली .त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ,गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हिवरे येथील सरपंच डॉक्टर दशरथ रुपवते ज्यांनी उघड्या माळरानावर वीस हजार वृक्षारोपण केले व आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या गावात अनेक वृक्ष लावून गाव समृद्ध केले व पंचक्रोशीत एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला. त्याचा दाखला देवून त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब या महापुरुषांच्या विचार हे निश्चितच आपल्याला मार्गदर्शक असून त्यानुसार वाटचाल करावी व कोणतेही कार्य करताना आपल्या कामावर निष्ठा ठेवून व देश हित समोर ठेवून प्रामाणिकपणे कार्य करावे असे आवाहन उपस्थित ग्रामस्थांना केले.एडवोकेट राहूल रोकडे यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब पानसरे यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, भानुदास रुपवते खंडू रुपवते, अनिल रूपवते, विनायक रुपवते, रामदास रुपवते यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच कार्यक्रमानंतर सर्व गावाने एकत्र येऊन सह भोजनाचा लाभ घेतला व एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला.
