
सिन्नर ( प्रतिनिधी ) आदि संतोष देवराम जाधव रा पेढेवाडी ( सोमठाणे ) ता.अकोले जि.अहमदनगर यांची मुलगी नवरी रोहिणी तसेच आदि.रामभाऊ विश्राम रोंगटे रा.कवडदरा ता.इगतपुरी जि.नाशिक यांचा मुलगा नवरा विजय यांचा लगिन कार्य सोमठाणे ( जाधववाडी )ता.अकोले येथे* धरतीमातेचे पुजन करून व क्रांतिकारक महापुरुषांना अभिवादन करून लगिन कार्य सोमठाणे ता. अकोले येथे संपन्न झाले.

आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी व क्रांतिकारक महापुरुषांचे विचार व त्यांची ओळख समाजाला व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लगिन कार्य आयोजित केला.नवरा नवरीने लगिन होण्या अगोदर धरतीमातेची सूर्य चंद्र डोंगर पशू पक्षी यांच्या प्रतीकृतीचे व वृक्षाचे पुजन करून क्रांतिकारक महापुरुषांना अभिवादन केले. आदिवासी समाज हा निसर्गाला मानणारा निसर्ग पुजक आहे.आदिवासी संस्कृती टिकवने ही प्रत्येक आदिवासी माणसाची जबाबदारी आहे

.सोमठाणे भागात प्रथमच आदिम लगिन कार्य पार पडले त्यामुळे निसर्ग पुजक लगिन कार्य प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजेत अशी उपस्थितांनी भावना व्यक्त केली.या लगिन कार्यात अक्षदा म्हणून तांदळा ऐवजी फुलांचा वापर करून अन्नाची नासाडी करू नये हा संदेश उपस्थितांना देण्यात आला.

तसेच, उपस्थित नातेवाईक व मित्रपरिवार यांनी नवरा नवरीला आशिर्वाद देऊन आदिम लगिन कार्याचे कौतुक केले.आदिवासी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते रामुभाऊ इदे यांनी आदिम लगिन कार्य ची पुजा विधी मांडणी केली.सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ मुठे यांनी आदिम लगिन कार्य बद्दल प्रबोधन केले.व सुप्रसिध्द गायक शरदभाऊ टिपे यांनी आदिम लगिन विधी पार पाडला. आदिम लगिन कार्यासाठी अ.भा आदिवासी विकास परिषद नवीन दिल्ली राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव व सेवानिवृत्त नायब तहसीलदार महामिञ दत्ता वायचळे सिन्नर यांनी मोबाईल द्वारे नवरा – नवरीला सदिच्छा देण्यात आल्या.या आदिम लगिन कार्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी सरपंच पेढेवाडी भागवत गातवे, सरपंच तिरडे विठ्ठल गोडे, सुप्रसिध्द गायक शरदभाऊ टिपे, राघोजी ब्रिगेडचे संस्थापक रामु इदे, सहसंस्थापक विजय मुठे,लक्ष्मण तळपे, डाॅ.विजय पोपेरे ज्ञानेश्वर झडे,शंकर बेंडकोळी, साहेबराव तातळे सर गणपत गोडे सर, जयराम खोकले, निवृत्ती गोडे,रमेश गोडे,, लक्ष्मण माळी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

