
नांदगाव (प्रतिनिधी )आ. सुहास कांदे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यांनी मागील वर्षी आंबेडकरी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला. लवकरच या स्मारकाचे काम सुरू होणार असून प्रत्येकाला अभिमान वाटेल असे डॉ.बाबासाहेब आंबेदार यांचे स्मारक आपण बांधू असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी दिला.स्मारकाची परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा ही तयार आहे सदर पुतळा १४ एप्रिल निमित्ताने आंबेडकर अनुयायी तसेच जनतेला अभिवादनासाठी दोन दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. एखाद्या महिन्यानंतर या स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल, समाजातील प्रत्येक व्यक्तीला विश्वासात घेऊन स्मारक बांधले जाईल, आपल्याला जी डिझाईन योग्य वाटेल ती सुचवा आपण तसेच स्मारक या ठिकाणी बनवणार असेही यावेळेस आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. “जयंती निमित्त उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्या”. यावेळी नांदगाव शहरातील विविध जयंती उत्सव समिती अध्यक्षांच्या वतीने अण्णांचा सत्कार करण्यात आला. तसेच समस्त आंबेडकरी जनता च्या वतीने ही अण्णांचा सत्कार करण्यात आला. आमदार सुहास कांदे यांनी सन्माननीय भंतेजी यांना चिवरदान भेट दिले. या प्रसंगी मोठ्या संख्येने भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.
