
मखमलाबाद विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते, पर्यवेक्षक सुनील पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.सविता आहेर यांनी सुत्रसंचलन करतांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कर्तृत्वावर प्रकाश टाकला.स्वातंत्र्य,समता, बंधुता,लोकशाही,माणुसकी सर्व घटकापर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले. सलग तीन वर्षांच्या अथक परिश्रमातून त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आदर्श होते. अशा शब्दात डाॅ.बाबासाहेबांचे गुणगान गायिले.कु. सर्वेश नरोटे व कु. हर्षल अहिरे (इ.५वी ड)यांनी ही भाषणातून “शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते पिल्यास गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.” शिक्षित व्हा, संघटित व्हा व संघर्ष करा.असा बाबासाहेब चा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.तसेच जेष्ठ शिक्षक प्रताप काळे यांनी ही आपल्या भाषणातून बाबासाहेब हे सर्वांचेच होते.ते दिन दलितांचे,शेतकऱ्यांचे कैवारी होते.प्रत्येक भारतीय नागरिकाला समान अधिकार प्राप्त करून दिला, ते एका विशिष्ट जातीचे किंवा समाजाचे नसून सर्वांचेच होते. बाबासाहेबांनी भारतातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ति कोन आहे?तर तो मतदार आहे असा राज्य घटनेत उल्लेख केला. म्हणून मतदान करणाऱ्या ला “मतदार राजा” असे संबोधले जावू लागले. अशा अनेक अप्रचलीत राज्य घटनेतील कलमांबद्दल माहीती देत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर किती महान होते हे स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
