
विंचूर दि.१४(प्रतिनिधी) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर प्रसंगी विद्यालयाचे विद्यार्थी सिद्धी बंधरे, ईश्वरी जाधव, धनश्री वाळेकर, दिशा धनवटे, स्नेहल सोनवणे ,तनिष्का शिरसाठ ,ज्ञानेश्वरी वेळूकर ,जयेश जेऊघाले ,गौरी चव्हाण ,आनंद उगले, प्रांजल कदम, आयुष वाजे, सिद्धी शर्मा, निखिल पिठे, समृद्धी तिपायले, मेहेक तांबोळी, तेजश्री जेऊघाले ,जान्हवी कुमावत, समृद्धी आरगडे, आदिती जेऊघाले आदी विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले.

. तर प्रा. राजेंद्र टिळेकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संघर्षमय जीवन, प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले शिक्षण, जाती व्यवस्थे विरुद्ध दिलेला लढा व त्यांचे समाजोपयोगी कार्या बाबत विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. तसेच पर्यवेक्षक सुदाम माळी यांनी विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श अंगीकारवा.तसेच बाळासाहेबांच्या शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या संदेशाची आठवण करून दिली. यावेळी राजेंद्र चांदे, एस एम पवार, अरुण साळुंके, प्रशांत कोळी, संदीप शिंदे,विद्या कुलकर्णी रमाई गटाच्या सदस्या वत्सलाबाई काळे, सिमा निकाळे, सुनिता साळवे तसेच महिला मंडळ विंचूरच्या सदस्या कविता रणखांबे ,कविता निकाळे, पुष्पा रणखांबे, द्रौपदाबाई, पायल सोनवणे आदींसह विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोबत छायाचित्र संदीप शिरसाट विंचूर (निफाड)
