
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन प्रसंगी प्राचार्य दवंगे व आदी
कसबे सुकेणे (प्रतिनिधी) ता 14- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते तर व्यासपीठावर प्रति डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत कु आदित्य मोरे, प्रसिद्ध विधीतज्ञ ॲड निर्मला अरिंगळे, अभिनवचे मुख्याध्यापक राहुल मोगल,कॉलेज विभाग प्रमुख राजेंद्र धनवटे, दिनेश मोरे,सुमित शार्दुल, चेतन चव्हाण, श्रीम पुनम वाघ,श्रीम योगिता चव्हाण श्रीम जे पी सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे व उपस्थितांच्या हस्ते डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक श्रीमती ठाकरे यांनी केले यावेळी अभिनव विद्यालयाचे विद्यार्थी कु स्वरा मड्ड्ररवार, कु वेदांत हळदे, कु दर्श भोजने, कु वैष्णवी शेवकर यांनी तर शिक्षकांच्या वतीने श्रीमती देशमुख यांनी डॉ आंबेडकरांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली तर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी भारतीय समाज व संविधानासाठी डॉ आंबेडकरांनी केलेले कार्य विशद केले सूत्रसंचालन चौथीची विद्यार्थिनी कु जानवी अरिंगळे हिने केले तर आभार कु श्रद्धा तिडके हिने मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते आकर्षक फलक लेखन कला शिक्षिका श्रीम आरती मोरे व श्रीम गायकवाड यांनी केले
