
विंचूर दि.१४ (प्रतिनिधी) येथील न्यू ब्लॉसम्स् इंग्लिश मिडियम स्कूल व समर्थ प्राथमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या ज्योती माठा, पूजा निकम, समन्वयक माधवी सहाय यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन महामानवास अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या शिक्षिका जयश्री नेवगे, खापरे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण, संविधान निर्मिती मधील योगदान, आणि सामाजिक समतेसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. तर विद्यार्थ्यांनी आपल्या

भाषणे व गीतांद्वारे बाबासाहेबांचे जीवन चरित्र सादर केले.महामानवाच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांचा वैचारिक विकास व्हावा.व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी. या सदहेतूने डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छ.शिवाजी महाराज, महात्मा गांधी, विज्ञान,बोधकथा यांचा समावेश असलेली ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करून वाचन करण्यास प्रवृत्त करण्यात आले

. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली कामडे यांनी केले.तर नेहा पुंड यांनी आभार प्रदर्शन केले.
