
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८७६ वा दिवस* *शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा:*अमर आनंदाचे वंशज! होय, तुम्ही लोक ईश्वराची लेकरे आहात. अमर आनंदाचे भागीदार, पावन आणि परिपूर्ण मानव. हे भूतलावरील देवतांनो, मानवाला दुर्बल आणि क्षुद्र पापी असे संबोधणे हेच मुळी पाप आहे. मानव जातीची ही कायमची बदनामी आहे. या! मृगेंद्रानो उठा! आणि तुम्ही मेंढरे आहात, हा भ्रम आधी टाकून द्या. तुम्ही सर्व अमर आत्मे आहात. मुक्त चैतन्य, आशीर्वादप्राप्त आणि अनादि अनंत ईश्वरस्वरूप आहात. आपल्यात अनंत शक्ती वसत आहे, अपरंपार ज्ञान साठवलेले आहे, अदम्य उत्साह रसरसतो आहे, असे तुम्ही चिंतन करा तर तुम्ही शक्तिशाली, सामर्थ्यवान व्हाल. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २४ चैत्र शके १९४७*
★ चैत्र वद्य/कृष्ण २★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १४ एप्रिल २०२५
★ राष्ट्रीय अग्नीशमन दल दिन
★ १६७५ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या ताराबाई राजाराम भोसले यांचा जन्मदिन.
★ १७३६ चिमाजी आप्पाने अद्वितीय पराक्रम करून जंजिऱ्याच्या सिध्दीचा दारुण पराभव केला.
★ १८९१ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती.डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
