
न्यायडोंगरी (प्रतिनिधी ) न्यायडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून रुग्णवाहिका नसल्याने पंचक्रोशीतील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रा. आ. केंद्र न्यायडोंगरी या ठिकाणी रुग्णांची संख्या लक्षणीय स्वरूपात असते, रुग्णवाहिका ही निगडीची बाब ठरलेली आहे. यापूर्वी प्राथ.आरोग्य केंद्राने जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी या अर्थाने पत्रव्यवहार व पाठपुरावा केलेला आहे. परंतु आजतागायत रुग्णवाहिका उपलब्ध झालेली नाही. म्हणून तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. सुहास आण्णा कांदे यांची न्यायडोंगरी परिसरातील विविध कामा संदर्भात संदर्भात नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंजी. दर्शन आहेर व तसेच नायडोंगरी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी. चेअरमन श्री. रामचंद्र आहेर यांच्या सहकाऱ्यां समवेत भेट घेतली असता चर्चेमध्ये आमदार साहेबांना रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासंदर्भात विनंती केली असता . मा.आमदार साहेबांनी तात्काळ जिल्हा परिषद नाशिकच्या प्रशासनाशी संपर्क साधून रुग्णवाहिका उपलब्ध करून देणेबाबत सूचित केले आहे .येत्या काही दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्र नायडोंगरीला अद्ययावत अशी रुग्णवाहिका उपलब्ध होईल असा आशावाद मा.आमदारांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.
