
कसाबखेडा ( प्रतिनिधी) “ *Cultivation Of Mind Should Be The Ultimate Aim Of Human Existence”.* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, भारताचे पहिले कायदा मंत्री, समाजसुधारक, थोर विचारवंत, दलितांचे नेते, वंचितांचे कैवारी आणि विद्वान कायदे पंडित डॉ.बी.आर.आंबेडकर यांची जयंती जि. प. प्राथमिक शाळा, कसाबखेडा येथे मोठ्या श्रद्धेने व थाटामाटात साजरी करण्यात आली.

उपस्थित शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर केल. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याद्वारे डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे वर्णन केले. कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आणि त्यांचे विचार आपल्या जीवनात अमलात आणण्याचा संकल्प करण्यात आला.यावेळी कसाबखेडा शाळेचे उपशिक्षक श्री.सागर गजभीव यांनी अतिशय सुंदरपणे कार्यक्रमाचे आयोजनअन नियोजन केले होते.शिका ! संघटित व्हा ! आणि संघर्ष करा!
