
नांदगाव (प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम ह्या होत्या.व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षक मार्कंड सर यांनी आपल्या मनोगतातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय सांगितला.अध्यक्षीय मनोगतातुन श्रीमती काळे मॅडम यांनी डॉ. बाबासाहेबआंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी,तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीलाप्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात हे सांगितले. याप्रसंगी इयत्ता ५च्या विद्यार्थिनी आराध्या कवडे व दिव्या सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन व आभार श्री. आहेर सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
