
वडांगळी…( प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी या विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार हे होते.

यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक, अभिनव बालविकास मंदिर विभागप्रमुख शीला आवारे, सुभाषराव ठोक, रामकृष्ण सानप, कैलास काळे, संदीप वारुंगसे, संदीपराव म्हस्के, मोहिनी क्षीरसागर, स्मिता वाघ, रवींद्र हांडगे, देविदास खालकर, राजाराम खेताडे, राजेंद्र गीते आदी उपस्थित होते. यावेळी आर्या बनसोडे, ऋषिका कोकाटे, आराध्या साळवे, धनश्री कोकाटे, रहेनुमा शेख, निकिता गीते, वैष्णवी खुळे, तेजल भोकनळ, प्रांजल खुळे या विद्यार्थिनींनी भाषणे केली.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार म्हणाले की महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा, हा मूलमंत्र दिला. डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिले. त्याचप्रमाणे आयुष्यभर दलित,दिन दुबळ्या व शोषितांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. जगात महान अशी संविधानाची रचना करून भारत देशास संविधानाची भेट दिली. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव सांगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाळासाहेब सांगळे यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
