
जळगाव निंबायती (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती/कसमादे अंशत:विनाअनुदानित शिक्षक परिवारा मार्फत मा. शिक्षणमंत्री महोदय *ना. दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन टप्पा वाढीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले. सदर भेटीत कसमादे परिसरातील शिक्षकांतर्फे मंत्रीमहोदयांकडे अनुदान टप्पा वाढ, परिपत्रकांची अंमलबजावणी करून तात्काळ पुढील टप्प्या प्रमाणे वेतन करण्याचे आदेश काढावे अशी मागणी केली. भुसे यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की तुम्हाला मिळालेले दोन टप्पे उपमुख्यमंत्री तथा तात्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात मिळाले आहेत. मा. शिंदेंनी सभागृहात दिलेल्या शब्दानुदार आमची कार्यवाही चालू आहे. त्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. काही तांत्रिक बाबीचा अडसर दूर करून शासन निर्णयाप्रमाने वाढीव टप्पा देण्यास शासन बांधील आहे असा शब्द मा. मंत्रिमंहोदयांनी दिला. कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिलेले निवेदन मंत्री महोदयांनी स्विकारले व कसमादे परिसरातील उपस्थित शिक्षकांचे प्रश्न ऐकून घेतले, त्यावर समाधानकारक उत्तरे दिलीत. निवेदन देण्यासाठी ज्येष्ठ शिक्षिक नेते आर .डी .निकम , चंद्रशेखर शेलार, प्रशांत पाटील ,कन्हैया पगार, संजय बच्छाव, विकास पगार, महेंद्र पवार, मधुकर गावित,संजय भदाणे, रवींद्र निकम, किरण जगताप, राजेश बोरसे, सुवर्णसिंग ठोके, ,श्रावण लोंढे,राजेश राजभोज, अमोघ नांद्रे, शेखर पाटील, शरद शेलार, दिनेश पाटील, रवींद्र पाटील, लियाकत शैदा, सचिन बच्छाव, रवींद्र बोरसे, राजेंद्र अहिरराव, चंद्रभान शेलार,आर. पी. मोराणकर, पी. आर. पाटील, सचिन भामरे, प्रशांत रुकारी, कमलेश पगार, उ्जैर अहं. जाकीर हुसैन, रमेश पवार, संतोष निकम , मनीषा चव्हाण, सरिता जाधव , चेतना भामरे, सोनल शिंपी उपस्थित होते
