
नाशिक – ‘जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला’ समाज सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने नेहमी सामाजिक कार्य करणारे पोलीस निरीक्षक रवींद्र राबवा रोकडे (वय ६१) यांचे दि. ७ -४-२०२४ रोजी समर्थ नगर येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर मातोरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आदिवासी विकास भवन येथील जात पडताळणी विभागातून त्यांनी २०२२ साली स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतली होती. रावबा नामदेव रोकडे यांचे ते द्वितीय पुत्र असून श्रीधर रावबा रोकडे यांचे ते लहान बंधू होते.त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती रोकडे, मुलगी अपूर्वा रोकडे, मुलगा सप्तश्री रोकडे असा परिवार आहे.
