
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एन. पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील व समन्वयक निंबाजी शिंदे होते. समवेत सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झालीत. प्रसंगी विद्यार्थ्यांनी व प्रा. सी. डी. राजपूत यांनी भीम गीते सादर केलीत. जेष्ठ शिक्षक डी. के. जगताप यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा सविस्तर आढावा घेतला. सूत्रसंचलन जेष्ठ शिक्षक डी. जे. देवरे यांनी केले तर आभार नरेंद्र अहिरे यांनी मानलेत.

