
.ओझर: दि.१४( वार्ताहर)येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन होऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षिका शितल हांडारे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ आंबेडकरांच्या जीवनावर भाषणे केली. शिक्षक मनोगत विशाल पगारे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी, डॉ.आंबेडकर त्यांचे लेखनकार्य व कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले. स्वातंत्र्य समता बंधुत्व न्यायासाठी लढा ऊभारला. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असा मंत्र त्यांनी देऊन देशातील कोट्यावधी जनतेच्या मनात आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर आदराचे स्थान मिळवल्याचे सांगितले. फलक रेखाटन मोहन क्षीरसागर मोनाली निकम यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले.
