
नांदगाव (प्रतिनिधी). आज 14 एप्रिल रोजी माऊली माध्यमिक विद्यालय पोखरी. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील शिक्षक श्री कदम सर, यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष निवडीची सूचना मांडली. या सूचनेस श्रीमती जे.पी. निकम. मॅडम,यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री घोडके सर, यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या जयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी गीता काकळीज, युवराज भोई,वर्षा देवरे,पूजा ठोंबरे, पूजा बोळीज, इत्यादी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.विद्यालयातील शिक्षक कदम सर,तसेच निकम मॅडम, यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री घोडके सर,यांनी अध्यक्षीय भाषण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, विचारांचा, उल्लेख केला अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही. व्ही. कदम सर, यांनी केले. या जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी असंख्य विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.जयंतीचा कार्यक्रम उत्साहात आनंदात संपन्न झाला
