
श्री.क्षेत्र जेजुरी येथील चैत्र पौर्णिमा निमित्ताने मंदिरामध्ये केलेली द्राक्षे
.ओझर: ( वार्ताहर)महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चैत्र पौर्णिमा यात्रा निमित्त द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वणी पाचोरे येथील प्रति जेजुरी मंदिरातील वाघे मंडळी व सेवेकरी यांनी जेजुरी येथील विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर यांच्या सहकार्याने व गुरुवर्य योगेश महाराज गवारे यांच्या आशीर्वादाने जेजुरी येथील मंदिरामध्ये मुख्य गाभाऱ्यातील देवांना १०१ किलो द्राक्षाचे हार व देवाचा गाभारा द्राक्षांनी सजवण्यात आला. यावेळी जेजुरी येथील विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर, जेजुरीचे मुख्य पुजारी, तसेच संपत काका गवळी, संतोष मामा गवारे, अमोल निफाडे, विलास काळे, निलेश निफाडे, गणेश निफाडे, दत्तू गवांदे, विशाल डेरे आदी सर्व भाविक भक्त उपस्थित होते. या उपक्रमाला ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सोपान वाटपाचे यांचे विशेष सहकार्य लाभले.
