
सिन्नर प्रतिनिधी – डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते.व्यासपीठावर पर्यवेक्षक उल्हास पवार,ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ पगार, विद्या ठाकरे,कचेश्वर शिंदे, सोमनाथ गिरी ,सुनिल ससाणे,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे, रोहिणी भगत आदी उपस्थित होते. उपस्थितींच्या हस्ते डॉ .आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक रंगनाथ उगले, उपशिक्षिका जयश्री गोहाड यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला.सूत्रसंचालन पी.आर.करपे यांनी तर आभार रामदास वारुंगसे यांनी मानले. यावेळी डी.ए.रबडे, सीमा गोसावी, सोमनाथ बोडके, शिवाजी गुरुळे , उत्तम कामडी,रेवणनाथ कांगणे,रवि गोजरे, किशोर शिंदे,ज्ञानेश्वर कडभाने आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
