
नांदगाव ( प्रतिनिधी ) दिनांक 12. 04. 2025. रोजी नांदगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी शाहिरी जलसा महामानवांच्या जीवनावर प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश कवडे माजी नगराध्यक्ष दत्तराज भाऊ छाजेड सुरेश आप्पा शेळके पत्रकार निकम ज्येष्ठ नेते अरुण भाऊ साळवे माजी नगरसेवक अनिल आप्पा जाधव वाल्मिक जगताप सर जयंती अध्यक्ष सचिन निकम सनी पवार विश्वास भाऊ अहिरे उमेश भाऊ शेलार सुभाष नाना कुटे राजेंद्र थोरात जामदरी सचिन भाऊ साळवे आरपीआय नेते नानाभाऊ जाधव सुजाता महिला मंडळाचे अध्यक्ष निर्मलाताई केदारे माता रमाई मंडळाचे अध्यक्ष अहिरे ताई विद्याताई कसबे शर्माताई आदी मान्यवर हजर होते

या कार्यक्रमांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे या महामानवावर व महामातांवरती गीतांच्या स्वरूपात गीतांचा जल्लोष शाहिरी जल्लोष हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ गांगुर्डे यांनी केले होते तरी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंद पवार यांनी केले

