
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८७४ वा दिवस* त्या महावीराचे, हनुमंताचे चरित्रच आदर्शरूप मानले पाहिजे. प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने त्यांनी महासागर ओलांडला. जीवन मरणाची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही. ते पूर्ण जितेंद्रिय होते. विलक्षण बुद्धीसंपन्न होते. दास्यभक्तीच्या या महान आदर्शानुसार तुम्ही आता आपले जीवन घडविले पाहिजे. गुरु आज्ञेचे निःशंक पालन आणि पूर्ण ब्रह्मचर्य यांतच यशाचे रहस्य साठलेले आहे. एकीकडे हनुमान जसे सेवाव्रताच्या आदर्शाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत, तसेच दुसरीकडे ते सिंहासारख्या पराक्रमाचे देखील प्रतीक आहेत. सारे जग त्यांच्यापुढे आदरयुक्त भयाने नतमस्तक होते. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २२ चैत्र शके १९४७*
★ चैत्र पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १२ एप्रिल २०२५
★ हनुमान जन्मोत्सव
★ कुलस्वामीनी मातेचा कुळधर्म
★ १३८२ मेवाडचा महापराक्रमी राजा राणा संग यांचा जन्मदिन
★ १७२० मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचा स्मृतीदिन
★ १८७१ आनंद या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, संपादक व चतुरस्त्र साहित्यिक वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्मदिन
★१९१० मराठीतील प्रतिभासंपन्न लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे तथा पु. भा. भावे यांचा जन्मदिन.मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।
★ हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा
