
बापु खैरनार (अध्यक्ष)
महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती महोत्सव समिती -२०२५ नांदगाव
लेखन:- ज्ञानेश पिसे,
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 वी जयंती नांदगाव मध्ये साजरी प्रचंड जल्लोषात साजरी झाली. आदरणीय आमदार सुहासअण्णा कांदे व सामाजिक कार्यकर्त्या अंजुमताई कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले जयंती साजरी झाली यंदाच्या जयंतीचे जिल्हाभर कौतुक झाले. महाज्योती विचारांचा जागर या टॅगलाईनने सदर आयोजन करण्यात आले होते.या जयंती निम्मिताने अनेक अभिनव संकल्पना राबविण्यात आल्या परंपरेच्या साथीने वासुदेवाचा ज्ञान जागर,तालुक्यातील तमाम महिला शिक्षिकांचा आधुनिक सावित्री या नात्याने सन्मान व कौतुक सोहळा,म. फुले यांच्या विचारवर आधारित महावक्तृत्व, महानिबंध स्पर्धा आणि आधुनिकतेची कास धरत इंस्टाग्राम महारिल्स स्पर्धा या सर्व स्पर्धा कार्यक्रम हे आठवडाभर चालल्या या मागील अभिनव कल्पना ही यंदाचा जयंतीचे अध्यक्ष बापू खैरनार यांची होती या कल्पना त्यांने प्रत्यक्षात आणल्या व एक आगळावेगळा जयंती महोत्सव साजरा झाला.या निमित्ताने आधुनिक सावित्रीचा ज्ञानाचा वसा पुढे चालवणाऱ्या वाचन संस्कृती जोपसणाऱ्या महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे व संत साहित्य अभ्यासक डॉ. प्रशांत भरवीरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.या जयंती महोत्सवाचे आयोजन हे यशस्वी झाले या मागे असणारी अभिनव संकल्पना ही कामालीची यशस्वी झाली.ज्योतिबांचे विचार घरघरात पेरले गेले.बापू खैरनार हा महाविद्यालयीन शिक्षण घेतांना आपल्या व्यक्तिमत्वाचा वेगळेपणा जपत शिक्षकांचा लाडका.घरात हरिपाठ आणि वारकरी संप्रदयाचे संस्कार असल्याने भक्तिमार्गावरील हा वाटकरी कधी इतर तारुण्यासूलभ मार्गांवर वळाल्याचे दिसले नाही.महाविद्यालयीन जनरल सेक्रेटरी ते यशस्वी उद्योजक हा प्रवास निरंतर होत आहे.नव नवीन संकल्पना या सुपीक डोक्यात कश्या येतात तर त्या मागे कारण आहे गावाविषयीं,समाजाप्रती, मित्रांविषयी वाटणारी आपुलकी.आपल्या गावाविषयीं आपुलकी सगळ्यांचीच असते पण अनेक बाहेर प्रगतीच्या संधी सोडून पंचक्रोशीत स्थिरवण्याचा जो निर्णय घेतो आणि घेतलेल्या निर्णयाला खरं सिद्ध करण्यासाठी कल्पकतेने मेहनत घेऊन अनेकांच्या सुख दुःखावर मायेचा पडदा टाकण्याचे कार्य करतो तो यशस्वी होतो.त्यातला हा एक. मंडप..केवळ शोभेला टाकतात असे नाही मंडप घरासमोर वा कार्यस्थळावर टाकण्यामागे अनेक संकल्पना आहेत सुख असो वा दुख आपल्या माणसांसोबत शेअर केल्यास सहज पचवता येते याच शेरिंगच्या भावनेला नव नवीन आधुनिक कल्पनेची जोड देत डेकोरेशन च्या नानाविध पद्धती जगा समोर आणून नांदगाव सारख्या भागात मेट्रो सिटी सारखा फील देणारा मंडप टाकणे एक दिव्य आहे.केवळ मंडपच नाही तर इव्हेंट मेनेजमेंटच सगळं काम बापू व त्याला साथ देणारे साथीदार सांभाळतात.शंकर बाबांचा निस्सीम भक्त असणारा हा बापू.भगवान नांदेश्वराचा भक्त.काही वर्षा पूर्वी नांदगावची अस्मिता असणारे हे मंदिर फारसे प्रसिद्धीच्या झोकात आले नाही परंतु माधवनाथ मंडळाचे व्यवस्थापन सुरु केल्यानंतर बापू व मित्रपरिवाराने शिवभक्ती ला ही कल्पकतेची प्रामाणिक भक्तीची जोड दिली आणि पंचक्रोशीत भक्तांचा ओघ वाढू लागला.योग्य नियोजन आणि निर्मल भक्ती या जोरावर महान शिवभक्त हंसराजबाबा यांचा लाईव्ह शिवभजनाचा कार्यक्रम या मंडळीने यशस्वी करून दाखवला.अर्थात यात बापूचा वाटा सिंहाचा होता.एक नयनरम्य कार्यक्रम नादगांव करांनी अनुभवला.तसंच यंदाचा म. फुले जयंती महोत्सव देखील चर्चीला जातोय.बापू..ने या जयंती महोत्सवनिमित्ताने नांदगावमध्ये विविध संकल्पना राबवत माणसांच्या सेवेसाठी दिनरात कटीबद्ध राहावे ही अपेक्षा.नादगांवकराची सेवा वारकरी महामंडळ व सावता महाराज उत्सव सेवा समिती च्या माध्यमातून बापूला थोरा मोठ्याची मोलाची साथ बापूला सदैव आहे. तसेच बापुजी सहचारिणी व बंधुंचीही साथ लाभत आहे.ज्या प्रमाणे बापू ..आपल्या व्यवसायाला कल्पकतेने वाढवत आहे त्याच प्रमाणे विविध स्वादाचे व्यजन करून आम्हास खाऊ घालावे आणि हॉटेल व्यवसायात भरारी घ्यावी सोबतच शिवभक्तीत लिन होत अनेकांच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमाला मायेचा मंडप टाकून आपुलकीने शोभा आणावी हिच शुभेच्छा ! अनोख्या आयोजना बद्दल नांदगाव मधील तमाम सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी कडून हार्दिक शुभेच्छा. शहरातील सांस्कृतिक व वैचारिक वारस्यात बापू खैरनार च्या कल्पकतेने अधिक भर घातली आहे आणि म. फुले व सावित्रीमाई यांचे विचार सर्वदूर प्रसारित केले आहे-
