
नांदगाव (प्रतिनिधी )मुंबई येथे पार पडलेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत कियान श्वेता विवेक डागा याची सिल्व्हर मेडल साठी निवड झाली आहे..अत्यंत चुरशीचे व प्रतिष्ठेचे स्पर्धेत कियांन ने हे यश संपादन केले आहे… कियान हा मलकापूरचे स्कूल ऑफ स्कवालर्स चा अष्ठपैलू विद्यार्थी आहे.आज पर्यंत विविध स्पर्धा मध्ये त्याने उत्तुंग यश संपादन करून शाळेचे नाव उज्वल केले आहे. कीयान नांदगाव येथील श्वेता विजय चोपडा हीचा मुलगा आहे… त्याचे मार्गदर्शक शिक्षक व शाळे चे सर्वत्र अभिनंदन होत आहे…
