
नांदगांव : मारुती जगधने
निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातात नंतर गाडीत असलेल्या एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याने
या घटनेचा नांदगाव न्यायालयात निकाल लागला असता या प्रकरणात आरोपीस दोन वर्ष सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा नांदगाव प्रथम न्यायालयाने सुनावली आहे. या निकालाने वाहनधारकांना चांगला चाप बसलाय.
केस क्र – S. C. C. No. 254/2013
क़लम – भा. दं. वि. 279, 304(A), 337, 338, 427 आणि मो. वाहन कायदा कलम 184
थोडक्यात
आरोपी केशव कचरू धात्रक याने दि 12/04/2013 रोजी त्याचे ताब्यातील मारुती ओमनी वाहन भरधाव वेगात चालवीत असतांना त्याचा वाहना वरील ताबा सुटून वाहन पोखरी पुलाजवळ पलटी झाले व त्यात असलेले प्रवासी यांना दुखापती होवून 2 वर्षांची मुलगी प्रतीक्षा पृथ्वीराज चव्हाण ही मयत झाली होती. आरोपी विरुद्ध सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले.
सरकार पक्षातर्फे पूर्व सरकारी अभियोक्ता श्री मेटकर, श्री एस. पी. आहेर, श्री पी. एस. मोरे यांनी प्रत्येकी 1-1 साक्षीदार तपासले व उर्वरित साक्षीदार सरकारी अभियोक्ता श्री चेतन पु. जायलवाल यांनी तपासले व आलेल्या पुराव्याच्या आधारे सरकार पक्षाची प्रखरपणे बाजू मांडून आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध झाल्याचे व मयत प्रतीक्षा हीचे मृत्युस आरोपीच जबाबदार असल्याचे त्यांच्या युक्तिवादातुन पटवून दिले.
या केसचे कामकाज नुकतेच नांदगांव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री जगदीश अग्निहोत्री साहेब यांच्या कोर्टात पार पडले
मे. न्यायालयाने आरोपीस भा. दं. वि. चे कलम 304(A), 279, 337, 338, व मो. वा. कायदा कलम 184 अन्वये दोषी धरुन त्यास भा. द. वि. कलम 304(A) अन्वये 2 वर्ष सश्रम कारावास व रक्कम रु. 10,000/- दंड अशी शिक्षा सुनावली आहे, याद्वारे कायदा मोडणाऱ्यांना मे. न्यायालयाने जणू एक संदेशच दिला आहे की न्याय मंदिरात आजही न्याय मिळतो.
याकामी पोलिस निरीक्षक श्री प्रीतम चौधरी यांचे मार्गदर्शनखाली कोर्ट पैरवी श्री सचिन मुंढे यांनी विशेष परिश्रम घेतले
