
नांदगाव (प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे, होरायझन अकॅडमी, नांदगाव येथे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या पुनम डी मढे यांनी भूषविले. प्राचार्या यांच्या हस्ते सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रास्ताविक भाषण शाळेच्या उपशिक्षिका अनुराधा खांडेकर यांनी केले त्यात त्यांनी सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली तसेच स्री शिक्षणासाठी केलेल्या खडतर प्रावासाबाबत माहिती सांगितलीयावेळी शालेय विद्यार्थी भैरवी साळुंखे,श्रेयस बोराडे,काव्य वाळके आदींनी भाषणे केली. या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.
