
वडांगळी.(प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी या विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार हे होते. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक, अभिनव बालविकास मंदिर प्रमुख शीला आवारे, काकासाहेब तांबे, राजश्री बोडके, अर्चना पोटे, देविदास खालकर, अपेक्षा दवंगे, सुभाषराव ठोक, संदीप खुळे, सोमनाथ बोंबले, रमेश जाधव, मधुकर बागुल, कैलास काळे, दिलिप सोनवणे,योगेश खुळे,विठ्ठल शिंदे, संदीप वारुंगसे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आले. यावेळी जेष्ठ शिक्षक विजय कोकाटे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली. बाळासाहेब सांगळे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला उजाळा दिला तसेच अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बाळासाहेब म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले हे समाजसुधारक, विचारवंत व लेखक होते. त्यांनी 1848 मध्ये पुणे येथे भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. अस्पृश्यता निवारण आणि जातीव्यवस्थेचे निर्मूलन तसेच मागासवर्गीय जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी अविरतपणे केले. असे प्रतिपादन त्यांनी या वेळेस केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीपराव म्हस्के यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन कैलास काळे यांनी केले.
