
जळगाव निंबायती (वार्ताहर) स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती माजी शिक्षणमंत्री बळीराम हिरे यांची पुण्यतिथी निमित्त येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील विद्यालयात यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एन. पवार होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील व समन्वयक निंबाजी शिंदे होते. समवेत सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करणारे, स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विविध ग्रंथाचे वाचन करुन त्यांच्या विचारांची अंगीकार करावा असे आवाहन प्रसंगी प्राचार्य पवार यांनी केले. माजी शिक्षणमंत्री बळीराम हिरे यांच्या प्रयत्नातूनच तालुक्यातील खेड्यापाड्यात बहुजनांसाठी शिक्षणांची सुविधा निर्माण झाली. १९८१ मध्ये अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या लावलेल्या शैक्षणिक रोपाचे आज विशाल वटवृक्षात रुपांतर होऊन हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत असे गौरवोद्गार निंबाजी शिंदे यांनी काढलेत. सूत्रसंचलन प्रा. अमोल अहिरे यांनी केले तर आभार व्ही. डी. काळे यांनी मानलेत.
