
नांदगाव (प्रतिनिधी ) ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय पांझणदेव ता. नांदगाव या शाळेचे विज्ञान व गणित शिक्षक, नांदगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. संजय जयश्री प्रभाकर बच्छाव यांचा एन.डी.एस.टी सोसायटी तर्फे नेट -सेट-उच्च शिक्षण पुरस्कार मिळाला असून त्यांना दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्करराव भगरे व म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे, के.के.आहिरे,नानासाहेब देवरे,सोसायटीचे अध्यक्ष .शांताराम देवरे,उपाध्यक्ष श्रीमती. भारतीताई पाटील ,माजी अध्यक्ष अरुण पवार, सर्व संचालक मंडळ टी .एन. सापनर , मार्कंड सर, सुनील कोठावदे, विष्णू कदम, उमेश बच्छाव अनेक मान्यवर उपस्थित होते. संजय बच्छाव यांनी 3 विषयात नेट- सेट , 5 विषयात पदविका ,5 विषयात पदवी ,9 विषयात पदव्युत्तर पदवी ,3 विषयात पात्रता परीक्षा तसेच मराठी विषयात पी.एचडी चे काम सुरू आहे. त्यांनी हिवाळी व उन्हाळी सत्रात 44 वेळेस विद्यापीठीय परीक्षा दिलीआहे . पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस अशोक ( बाबा )डघळे पाटील, अध्यक्ष उत्तम गायकवाड , गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, ठोके मॅडम , केंद्र प्रमुख उत्तम सोनवणे , छत्रे हाय स्कूलचे संचालक प्रसाद पंचवाघ , माजी विज्ञान तालुका अध्यक्ष सी.डी अहिरे , नांदगाव तालुका कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा पाटील , मोहन कदम ,अनिल गोरे ,सचिन अहिरे, रवींद्र गायकवाड ,बापू पगारे शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.
