
नासाका विद्यालयात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना मुख्याध्यापक अरुण पगार, चंद्रकांत खानकरी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी.
नाशिकरोड:- पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील विद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. नासाका माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक चंद्रकांत खानकरी, विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी महात्मा फुले यांच्या समाज सुधारणा आणि स्त्री शिक्षणाच्या महनीय कार्याला उजाळा दिला. विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
